भीमगीतांच्या समुहगायन स्पर्धेत प्रज्ञासूर्य आसोली प्रथम

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी शाखा वेंगुर्ला आणि भारतीय बौद्ध महासभा वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यामान वेंगुर्ला हायस्कूलच्या सभागृहात घेतलेल्या होता तो भीम माझा‘ भीमगीतांच्या समुहगायन स्पर्धेत आसोली येथील प्रज्ञासूर्य ग्रुपने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

      स्पर्धेचे उद्घाटन कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिधुदुर्गचे महासचिव किशोर कदम व फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच वेंगुर्लाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी समर्पण फाऊंडेशन सिधुदुर्ग अध्यक्ष सुहास कोळसुलकरअपरान्त साहित्य कला प्रबोधिनी सिधुदुर्गचे सरचिटणीस राजेश् कदमअपरान्तचे कणकवली तालुकाध्यक्ष सिद्धार्थ तांबेसिधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकरबॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा.वसंत नंदगिरीकरभारतीय बौद्ध महासभेचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष चंद्रकांत म्हापणकरसचिव रामचंद्र जाधवअपरान्तचे सरचिटणीस लाडू जाधवचिटणीस कर्पूरगौर जाधवखजिनदार सुंदर म्हापणकरमठ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनिल जाधवभारतीय बौद्ध महासभा वेंगुर्ल्याचे हिशोब तपासणीस अशोक सावळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे अध्यक्ष महेंद्र मातोंडकर यांनी केले.

      स्पर्धेत मालवण येथील फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचने द्वितीयआडेलीतील उत्कर्षा महिला मंडळाने तृतीयतर रमाई कलाविष्कार ग्रुप मडुरा व भीमनगर सरमळे ग्रुपने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले. विजेत्यांना जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवीसामाजिक कार्यकर्ते नितीन मांजरेकरइंजिनिअर अनिल जाधवसुहास कोळसुलकर व संजय मातोंडकर यांनी पुरस्कृत केलेली पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे परिक्षण म्हापण येथील भाई साटेलकर व तुळसमधील श्रद्धा नाईक-तांडेल यांनी केले.

      स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लाडू जाधवरामचंद्र जाधवमधुकर मातोंडकरसगुण मातोंडकरचंद्रकांत म्हापणकरसुंदर म्हापणकरजयप्रकाश चमणकरसुनिल जाधवस्वप्निल होडावडेकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आराध्या जाधव हिने भीमगीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.

Leave a Reply

Close Menu