डच वखारीच्या कामाची पुरातत्व विभागाकडून पाहणी

वेंगुर्ला येथील डच वखारचे पुरातत्व विभागामार्फत सुरू असलेल्या कामाची पाहणी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.विलास वाहने, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजिव लिगवत, अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वेंगुर्ला उपाध्यक्षा सिमंतीनी मयेकर व पहारेकरी आनंद मिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत केली. स्वराज्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेल्या वेंगुर्ला कोर्ड उर्फ डच वखार या ऐतिहासिक वास्तूच्या भितींना वडाच्या झाडांनी वेढलेले असून ही झाडे नक्कीच काढली जातील. पण ती काढत असताना मूळ ढाच्यातील प्रत्येक दगड वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही झाडे पावसाळ्यापूर्वी काढली जाणार आहेत, अशी माहिती पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.विलास वाहाने यांनी दिली.

Leave a Reply

Close Menu