पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी सिद्ध व्हा!-नासीरभाई बोरसादवाला

सिधुदुर्गच्या सर्व भागात रोटरी क्लब समाजातील गरजू लोकांसाठी सर्वोत्तम सेवाभागी कामगिरी बजावत आहेत. अशाप्रकारच्या सेवांसोबतच जगातून पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी नूतन वर्ल्ड पोलिओ चेअरमन व रोटरी डायरेक्टर के.पी.नागेश यांच्या प्रभावी नेतृत्व व मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी सिद्ध होऊया असे आवाहन पदग्रहण अधिकारी नासीरभाई बोरसादवाला यांनी…

0 Comments

मोचेमाड पुलाच्या संरक्षक कठड्याचा काही भाग कोसळल्याने धोका

वेंगुर्ला-शिरोडा या सागरी महामार्गावरील मोचेमाड पुलाच्या संरक्षक कठड्याचा काही भाग कोसळल्याचे निदर्शनास आले आहे. या कोसळलेल्या भागामुळे त्याठिकाणी धोका निर्माण झाला आहे. तेथील रहदारी आणि एकंदर परिस्थिती विचारात घेता कोसळलेल्या कठड्याच्या भागाबाबत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. वेंगुर्ला-शिरोडा या सागरी…

0 Comments

उज्जयनी मांजरेकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

रा.कृ.पाटकर हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका उज्जयनी नारायण मांजरेकर या ३० जून रोजी नियतवयोमानानुसार सेवेतून निवृत्त झाल्या. त्याबद्दल वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्यावतीने त्यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.       मठ येथील डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन जयप्रकाश चमणकर, दाभोली…

0 Comments

समाजाकडून मिळणारा सन्मान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी-अॅड.गोडकर

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा मंडळाच्या समाजविकास दृष्टिकोनाचा अविभाज्य भाग आहे. गुणी विद्यार्थ्यांना समाजाकडून मिळणारा सन्मान त्यांना यशाकडे नेणा-या वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरतो. विद्यार्थ्यांनी आपली आवड ओळखून अधिकारी किवा उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा. तसेच आपले भविष्य घडवताना समाजाच्या आशा-अपेक्षांचे प्रतिक बनावेत,  असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष अॅड.श्याम…

0 Comments

चव्हाण यांच्या निवडीने वेंगुर्ल्यात जल्लोष

माजी मंत्री रविद्र चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर १ जुलै रोजी वेंगुर्ला भाजपातर्फे कार्यालयाच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, साईप्रसाद नाईक, राजन गिरप, वृंदा गवंडळकर, श्रेया मयेकर, प्रणव वायंगणकर, हेमंत गावडे, राहूल मोर्डेकर, शरद मेस्त्री, शितल आंगचेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित…

0 Comments

योग्य मार्गदर्शन घेऊन शेतक-यांनी शेती करावी-वासुदेव नाईक

सध्या शेतीच्या बाबतीत तंत्रज्ञान विकसित होऊन आधुनिकीकरण झाले आहे. शेती करत असताना कोकण कृषी विद्यापीठाने जे मार्ग सुचवलेले असतील, त्याचे जे प्रमाण दिले आहे त्या पद्धतीने त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे. ब-याच ठिकाणी लोक सेंद्रिय शेती, भाजीपाला याकडे वळायला लागली आहेत. यात वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे…

0 Comments

दत्तक पालक उपक्रमातील 42 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा, वेंगुर्ला ही संस्था मागील 3 वर्षे ‌‘दत्तक पालक‌’ उपक्रम राबवित आहे. यंदाचे चौथे वर्ष आहे. यावष होतकरू, अभ्यासू व आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील एकूण 42 विद्यार्थ्यांना ‌‘दत्तक पालक‌’ उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले असून त्यांना…

0 Comments

शहराच्या सर्वांगिण विकासासाठी नागरी कृती समिती ॲक्शन मोडवर

स्वच्छतेमध्ये नावलौकीक प्राप्त केलेले वेंगुर्ला शहर पालिकेच्या चाललेल्या धीम्या कारभारामुळे समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. शहरात अनेक समस्या निर्माण झाल्याने जागरूक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत नागरी कृती समिती पुनर्जिवीत केली आहे. या समितीतर्फे विविध विकासकामांचा स्पॉट पंचनाम्यांवर भर देत कामांची झालेली परिस्थिती जनतेसमोर आणली…

0 Comments

शैक्षणिक प्रगतीसाठी मोबाईलचा वापर करा – डॉ. शरयू आसोलकर

 मोबाईल ही सध्याची गरज असली तरी त्याचा उपयोग शैक्षणिक प्रगतीसाठी करून संस्कारक्षम बना. बाल साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे, त्याचे वाचन विद्यार्थ्यांनी करा. वाचनाने माणूस आणि समाज वाचता येतो. यासाठी प्रत्येकाने दररोज वाचन करा, असा सल्ला कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील…

0 Comments

बावडेकर विद्यालय मुख्याध्यापकपदी आबा कांबळी

आरवलीतील श्री देव वेतोबा देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खजिनदार मंगेश उर्फ आबा कांबळी यांची शिरोडा येथील अ.वि.बावडेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी बढतीने नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल वेतोबा देवस्थान समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष जयवंत राय, सचिव आबा टांककर, विश्वस्त…

0 Comments
Close Menu