►सिधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटींची मदत

     निसर्गचक्रीवादामुळे जिल्ह्यात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटींची मदत जाहीर केली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्ह्यामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. त्यांच्या पंचनाम्यांचे काम सुरु असून एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. शासनाकडून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.

This Post Has One Comment

  1. सिंधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटींची नुकसान भरपाई मदत म्हणजे वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
    सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्ग चक्रिवादळामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रकारे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झालेली आहे.अनेकांच्या गुरांच्या गोठ्यांची पडझड झाली आहे. आंबा, काजू, केळी, फणस, भिरंड तसेच अन्य झाडांची पडझड झाल्यामुळे खूप नुकसान झाले आहे.
    त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकरी हतबल झाले आहेत.कोकणातील शेतकरी नुकसान झाले म्हणून शासनाकडे मदत मागत नाही. हि कोकणच्या शेतकऱ्यांची परंपरा आहे. म्हणून शासनाने नेहमी प्रमाणे दुर्लक्ष करू नये. महाराष्ट्र आघाडी सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील जी २५ कोटींची नुकसान भरपाई जाहीर केली आहे ती योग्य नसून ५० कोटी पेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे.
    त्याकरिता सरकारने नुकसान भरपाईचे जुने निकष बदलून नवीन निकषांवर आधारित नुकसान भरपाई जाहीर करणे आवश्यक आहे. शासनाने योग्य प्रकारे सर्वे करावेत जेणेकरून कोणीही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहाणार नाही याची काळजी घ्यावी. अशी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो.
    प्रेमानंद कुडाळकर.

Leave a Reply to Premanand V. Kudalkar Cancel reply

Close Menu