वेंगुर्ला शहरात दोन नोंदणी कक्ष कार्यान्वित

मुंबई-पुणे तसेच इतर जिल्ह्यातून वेंगुर्ला शहरात येणा-या नागरिकांची नगरपरिषद प्रशासनाकडे नोंद होण्यासाठी मानसीश्वर पूलदाभोली नाकाअणसूर नाकापारपोली नाका येथे नोंदणी कक्ष उभारण्यात यावेत असे नगपरिषदेच्या बैठकीत ठरविण्यात आले होते. त्यानुसार भटवाडी वरसकर स्टॉप व अणसूर नाका येथे नोंदणी कक्ष उभारण्यात आले असून सदरचे नोंदणी कक्ष २१ जुलै पासून कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली.

      वरिल दोन्ही ठिकाणी परजिल्ह्यातून आलेल्या सर्व लोकांची नोंद केली जाणार आहे. तसेच त्यांना क्वारंटाईन कालावधीमध्ये घ्यावयाची काळजी व कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना देण्यात येणार आहेत. बाहेरुन येणा-या लोकांना वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या नोंदणी कक्षामध्ये एक नगरपरिषर कर्मचारी आणि पोलिस प्रशासनातर्फे होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे.

      ही सर्व व्यवस्था गणेशोत्सव कालावधीमध्ये वेंगुर्ला शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेली असून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष गिरप यांनी केले आहे.

This Post Has One Comment

  1. Well done COVID Warriors. Don’t compromise.
    Thanks

Leave a Reply to VINAY PATIL Cancel reply

Close Menu