वेंगुर्ला शहरासह तालुक्यात आज काही घरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. सायंकाळपासून श्रीकृष्णाच्या पूजनाला सुरुवात झाली. श्रीकृष्णाच्या मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर नैवेद्य व आरती करुन घरातील व्यक्तिनी श्रीकृष्ण जन्माचा आनंद लुटला. प्रत्येकाच्या परंपरेनुसार बाळकृष्ण, राधाकृष्ण तसेच गाय सोबत असलेल्या कृष्णाचे पूजन करण्यात आले. भक्तीभावाने श्रीकृष्णचरणी नतमस्तक होऊन कोरोना संकट टळावे अशी प्रार्थना केली.

Leave a Reply

Close Menu