वेंगुर्ला तालुक्यात आत्तापर्यंत (दि.१८) एकूण २५१ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून त्यापैकी १६६ रुग्ण बरे झाले आहेत. तर ८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण रुग्णांमधून ४ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.

      दरम्यान, दि. १८ रोजी केलेल्या रॅपिड टेस्ट अहवालात रेडी गावात २, म्हापण गावात २ आणि वेंगुर्ला शहरामध्ये ४ जणांचा समावेश असून सर्व रुग्ण नविन आहेत.

Leave a Reply

Close Menu