वेंगुर्ला येथील सातेरी मंदिरात दरवर्षी विविध कार्यक्रमांनी नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो. मात्रकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने धार्मिक स्थळांवरील बंदी अद्यापपर्यंत उठविली नसल्याने यावर्षीच्या १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत होणारा मंदिरातील नवरात्रौत्सव मंदिर बंद असल्याने रद्द करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्ट व मानकरी यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. सर्व भाविकांनी आपल्या घरीच देवीची उपासना करुन कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करावी असे आवाहन श्रीदेवी सातेरी देवस्थानच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Close Menu