राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी शासनातर्फे दि. १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने वेंगुर्ला येथील नगरवाचनालयात रविवार दि.२४ जानेवारी २०२१ रोजी ग्रंथालयाच्या कामकाजाच्या वेळेत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

          या ग्रंथ प्रदर्शनामध्ये कथाकादंबरीइतिहासभूगोलधार्मिकप्रवासचरित्र, भविष्यशिक्षणभाषा इत्यादी विषयावरील पुस्तके मांडण्यात येणार आहेत. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ९ वाजता साहित्यिक विरधवल परब यांच्या हस्ते होणार आहे. तरी या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरवाचनालय संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Close Menu