पं.वसंतराव गाडगीळ यांना शृंगेरी पीठाचा सन्मान

शृंगेरी शारदापीठ, शंकराचार्य यांच्यावतीने संस्कृतचे गाढे अभ्यासक, ‘शारदाज्ञानपीठम्चे मूळ संस्थापक आणि शारदाचे संपादक पं.वसंतराव गाडगीळ यांचा संस्कृतमधील अतुलनीय योगदानाबद्दल गौरव करण्यात येणार आहे. शिशूशाळांतून संस्कृतहा कार्यक्रम देशात व देशाबाहेर राबविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची इच्छा पं.गाडगीळ यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली. १९ एप्रिलला ७० विद्वानांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात पं.गाडगीळ यांच्या नावाचाही समावेश आहे. १ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

      प्रत्येक शिशूशाळेत संस्कृत, हा माझा नव्वदीनिमित्त संकल्प आहे. हा संकल्प माझ्या हातून पूर्ण झालेला पाहणे, हे मी जनताजर्नादनाच्याच सहकार्य, कृपेवर सोपवतो असे मत पं.गाडगीळ यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Close Menu