कफ्र्यूच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला बाजारापेठेत गर्दी

वेंगुर्ल्यात ६ मे पासून होणा-या जनता कफ्र्यूच्या पार्श्वभूमीवर बुधवारी अगदी सकाळी ७ वाजल्यापासूनच मार्केटमध्ये ग्राहकांनी कडधान्य, भाजीपाला वगैरे खरेदीसाठी गर्दी केली. खरेदीसाठी केवळ एकाच दिवसाची सवलत मिळाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी दिसत होती.

वेंगुर्ला तालुक्यासह शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ६ मेपासून दहा दिवसांच्या कफ्र्यूचा निर्णय ४ मे रोजी आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला हता. या कफ्र्यूच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी आठवडा बाजाराप्रमाणे लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली. मार्केटमधील सर्व किराणा दुकाने, बँका, भाजी मार्केट, मच्छिमार्केट येथे ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. तर रस्त्यांवर सुद्धा वाहनांची संख्या वाढल्याने ठिकठिकाणी वाहतुक कोंडी होत होती.

Leave a Reply

Close Menu