वादळानंतर झाडे तोडण्याची कामे सुरु

ताऊकतीचक्रीवादळाचा वेंगुर्ला तालुक्याला बसल्यानंतर ब-याच ठिकाणी घरांवर, रस्त्यांवर तसेच मंदिरांवर झाडे पडण्याचे प्रकार घडले. आज सोमवारी थांबल्यानंतर घरांवरील, मार्गावरील तसेच मंदिरांवरील झाडे तोडण्याचे काम सुरु होते. काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी पडलेली झाडे ग्रामस्थांनी श्रमदानाने बाजूला करुन रस्त्या मोकळा केला. काही झाडे ही विद्युत खांबावर तसेच तारांवर पडल्यामुळे विद्युत खांब मोडून पडले तर ताराही तुटल्यामुळे संपूर्ण विज पुरवठा खंडीत झाला आहे. मोडून पडलेले विद्युत खांब व तुटलेल्या तारा कार्यान्वित करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्ध पातळीवर काम करीत आहेत. मात्र, तालुक्यात मंगळवारी दुपारी १२.३० पर्यंत तरी विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे सर्वत्र काळोखच काळोख दिसत होता.

This Post Has One Comment

  1. भूमिगत तारा पर्याय कसा आहे

Leave a Reply to Ajay marathe Cancel reply

Close Menu