►इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे १० ते १९ सप्टेंबर २०२१ कालावधीत शहर मर्यादित इको फ्रेंडली गणेश उत्सव‘ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

       गणेश मूर्ती ही संपूर्ण मातीची इको फ्रेंडली असावी, सजावटीमध्ये थर्मकॉल, पीओपी, प्लास्टिक साहित्यांचा वापरा न करता फक्त नैसर्गिक वस्तूंचा वापर करावा, पर्यावरण संवर्धन,  स्वच्छतेबाबतचे, टाकाऊ वस्तूंचे पुनर्वापर आदी विषयांवरील सजावटींला अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. सजावटीचे ३ वेगवेगळे फोटो, स्पर्धकांचे नाव, पत्ता, संफ क्रमांक, सजावटीची थोडक्यात माहिती  नगरपरिषदेच्या  swachhvengurla@gmail.com  या अधिकृत ईमेलवर १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठवावेत. तसेच स्पर्धकांनी आपल्या सजावटीचे फोटो स्वतःच्या फेसबुक पेजला अपलोड करताना तो फोटो वेंगुर्ला नगरपरिषदेच्या Swachh Vengurla (@VengurlaMC) या पेजलाही टॅग करावे आणि #swachhVengurla#EcofriendlyGanesh#mazivasundhara ई.टॅगचा वापर करावा.

           

Leave a Reply

Close Menu