वृक्ष लागवडीने मोहिमेचा शुभारंभ

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरात विविध प्रकारची झाडे लावण्यात येणार आहे. याचा शुभारंभ आज कृषी दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करुन करण्यात आला.

      मोठ्या प्रमाणात होणा-या वृक्ष तोडीमुळे हवेचे प्रदूषण, जमिनीची धूप वाढत आहे. याचा विचार करुन वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरामध्ये वृक्ष लागवड करण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. यात जांभूळ, बेहडा, कोकम, पिपळ, पळस, पेरु, आवळा आदी झाडांची लागवड करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे वृक्ष लागवड मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, नगरपरिषदेचे वैभव म्हाकवेकर, अशोक गिरप व अन्य कर्मचारी उपस्थित होते. येणा-या काळात उपलब्ध व आवश्यक त्या ठिकाणी नगरपरिषदेमार्फत वसुंधरा अभियानांतर्गत वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली.

Leave a Reply

Close Menu