मेडिटेशनला उत्स्फूर्त प्रतिसाद

27 जून रोजी वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर सभागृह येथे पार पडलेल्या परफेक्ट अकॅडेमी आयोजित महासंजीवनी मोफत मेडिटेशन प्रशिक्षण वर्गास मेडिटेशन प्रेमींचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रमास उपस्थित जनतेला स्वतः दिव्यत्वाचे तेज असलेल्या श्री.सत्यमामुनी यांनी मेडिटेशनचे धडे दिले. सिंधुदुर्गात प्रथमच होत असलेल्या अतिशय उपयुक्त अशा शिबिरासाठी केंद्रिय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, परफेक्ट अकॅडेमीचे सर्वेसर्वा प्रा. राजाराम परब, एक्सेल ग्रुप ऑफ स्कूलच्या ब्रिंदा मॅडम, डॉ. श्रीकुमार, वेंगुर्ला शहराचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप, तहसीलदार प्रविण लोकरे, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे, राजू राऊळ, कोकण नाऊचे विकास गावकर इत्यादी उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजाराम परब यांनी केले, त्यानंतर श्री. अंजनेया स्वामी स्पिरिट्युअल ट्रस्ट बद्दल डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली, त्यानंतर मेडिटेशनचे प्रशिक्षण देण्यात आले. मेडिटेशन सोबत या कार्यक्रमामध्ये दक्षिण भारतातील प्रसिद्ध कलाकारांनी भजन आणि नृत्य सादर करत कोकण वासियांची मने जिंकली. तसेच मेडिटेशच्या प्रत्यक्षिकांमुळे लोकांकडून स्वामींजींच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोमवार, तसेच पाऊस असून देखील कार्यक्रमामध्ये गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर येथून 500 जणांनी भाग घेतल्याने, परफेक्ट अकॅडेमीच्या उत्कृष्ट आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Close Menu