रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न

  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती हिरक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वेंगुर्ला शाखेतर्फे आडेली शाळा नं.1 मधील सुमारे 100 शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर तालुकाध्यक्ष सिताराम लांबर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव परब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

      यावेळी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या प्रा.डॉ.सोनाली सावंत, मुख्याध्यापक भिवा सावंत, जिल्हा उपाध्यक्ष व केंद्रप्रमुख लवू चव्हाण, शिक्षक पतपेढीचे संचालक भाऊ आजगांवकर, सचिव प्रसाद जाधव, कोषाध्यक्ष तुळशीदास पाटकर, विभागीय अध्यक्ष कालिदास खानोलकर, महिला आघाडी जिल्हा संघटक रेश्‍मा वरसकर, तालुका संपर्क प्रमुख दत्ताराम तवटे, प्रसिद्धी प्रमुख प्रकाश भोई, उमेश वजराटकर, महिला आघाडी प्रसिध्दी प्रमुख ऋतिका राऊळ, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी हर्षाली सावंत, तन्वी पाटील, पियूष हिवाळे, ओबेयदुल्लाह शेख, लॅब टेक्निशियन दिव्या आडारकर, निशा राऊत, आडेली नं.1 शाळेच्या पदवीधर शिक्षिका संचिता सावंत व शिक्षक समिती वेंगुर्लाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

      शिक्षक समिती मार्फत पूर्व माध्यमिक ऑनलाईन सराव परीक्षेत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हिरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून उमेश वजराटकर, गौरव नाईक, आशुतोष पावले या तंत्रस्नेही शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu