‘कडोबा‘ बचतगटास कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार

महाराष्ट्र शासनाच्या वनविभागांतर्गत कांदळवन कक्षाकडून राबविण्यात येणा-या योजनेंतर्गत कांदळवन संरक्षण व उपजिविका निर्माण योजना याचा समावेश आहे. या योजनेंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील आरवली-टांक येथे कांदळवन क्षेत्रात पिजरा मत्स्यशेती प्रकल्प तेथील कडोबाबचतगटामार्फत उभारण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत जिताडा (चणक) आणि काळूंदर या जातीच्या माशांचे यशस्वीपणे पालन करण्यात आले होते व त्याचीही विक्री केली होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून कांदळवन परिसरात रहाणा-या नागरिकांच्या उपजिविकेचा प्रश्नही मिटला आणि कांदळवनाचे संवर्धनही झाले. हा दुहेरी उद्देश यशस्वी साध्य झाल्याबद्दल शासनाच्या कांदळवन विभागाने कडोबा बचतगटास मुख्यमंत्री एकनाथ शिदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कडोबा बचतगटाच्यावतीने निकेश प्रभू, राजेश मोंडकर, रेजीनाल्ड फर्नांडीस, प्रभाकर मोंडकर, सुनिल चोपडेकर, किस्तू सोज आदींनी हा पुरस्कार स्विकारला.

     वेंगुर्ला तालुक्यातील प्रथमच विशेष कार्याबद्दल भाजप वेंगुर्ला तालुकाच्यावतीने २८ जुलै रोजी सागरतीर्थ-टांक (गांबीतवाडी) येथील विठ्ठल मंदिरामध्ये कडोबा गटया ग्रुपचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, लक्ष्मीकांत कर्पे, मनवेल फर्नांडीस, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, आरवली सरपंच तातोबा कुडव, विजय बागकर, जगन्नाथ राणे, बाळू वस्त, अनुराधा मोठे, श्रीकृष्ण धानजी, सोमकांत सावंत, चंद्रशेखर गोडकर, महेश न्हावेलकर, प्रकाश रेगे आदी उपस्थित होते.

     तसेच वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीनेही या यशाबद्दल बचतगटाचे अध्यक्ष नरेंद्र मोंडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सेनेचे बाळा दळवी, यशवंत परब, अजित राऊळ, सचिन देसाई, सुकन्या नरसुले, विवेक आरोलकर, संदेश निकम, तुषार सापळे, वायंगणी सरपंच सुमन कामत, संजय गावडे, श्रीकांत घाटे, संजय परब, उमेश नाईक, मनोहर येरम, सौ.कुडव, नेहा साळगावकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu