बदलत्या परिस्थितीत ग्रंथालये बदलणे आवश्यक-सचिन हजारे

        सिधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय आणि नगर वाचनालय वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ जुलै रोजी वेंगुर्ला नगरवाचनालयात तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील पदाधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा पार पडली. ज्ञानवृद्धीसाठी ग्रंथालयांना अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे कार्यवाह कैवल्य पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले. तर सदस्य महेश बोवलेकर यांनी कार्यशाळा आयोजनाचा उद्देश सांगून जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांनी कार्यशाळांचे आयोजन करण्यास सांगितले असून याची सुरुवात वेंगुर्ला नगरवाचनालयातून केल्याबद्दल अभिनंदन केले आणि जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या अडचणी जाणून त्या निवारण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही सांगितले.

     कोरोना प्रादुर्भावानंतर बदलत्या परिस्थितीमुळे सर्वच क्षेत्रात फरक पडला आहे. वाचकांच्या वाचनात खंड पडत आहे. त्यामुळे ग्रंथालयांनी ही या बदलत्या परिस्थितीचा विचार करुन बदलले पाहिजे. ग्रंथालयांचा ग्रुप करा. दरदिवशी निदान ५ पुस्तके तरी व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवा. त्यांना आवड निर्माण झाल्यावर ते ग्रंथालयाकडे पुन्हा वळतील असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी वेंगुर्ला येथे केले.

     या कार्यशाळेस वेंगुर्ला वाचनालयाच्या सदस्य माया परब, तुळस ग्रंथालयाचे खजिनदार प्रकाश परब, केळुस ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रमोद मडकईकर, सातेरी वाचनालय वेतोरेचे ग्रंथपाल न्हानू राऊळ, कोचरे ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सिद्धी शिरसाट, लिपिक अलका फणसेकर, रेडी ग्रामपंचायतीचे गणेश बागायतकर, ग्रंथपाल सिद्धेश गोसावी, श्रीराम वाचनालय होडावडेचे ग्रंथपाल पूर्वा सावंत, तुळस ग्रंथपाल तेजस्वी ठुंबरे, नवजीवन वाचनालयाचे ग्रंथपाल प्रकाश पालयेकर यांच्यासह वेंगुर्ला नगरवाचनालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu