शहरातील खड्डयांना न.प.चा भोंगळ कारभार जबाबदार

    वेंगुर्ला शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झालेले असून त्यास केवळ वेंगुर्ला नगरपरिषदेचा भोंगळ कारभार व संबंधित अधिकारी हेच जबाबदार आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

      त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कीशहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाले असून रस्त्यात खड्डे कीखड्यात रस्ता  हेच कळेनासे झाले आहे. त्यामुळे वाहनचालक व पादचारी लोकांना याचा त्रास होत असून बरेच छोटे-मोठे अपघात देखील झाले आहे. एखादा मोठा अपघात होऊन जीवही गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि असे झाल्यास केवळ वेंगुर्ला नगरपरिषद व त्याचे संबंधित ठेकेदार आणि अधिकारी हेच जबाबदार असणार आहेत.

      भुमिगत विजवाहिनी तसेच भुमिगत गॅस पाईप लाईन घालण्यासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आले होते. मात्रठेकेदारावर न.प.चा कोणताही अंकुश नसल्याने ठेकेदाराने मनमानीप्रमाणे रस्त्यांची खोदाई केली. ते पूर्ववत करुन घेण्याची जबाबदारी न.प.ची असताना त्यांन जाणिपूर्वक दुर्लक्ष केले आहे. नियमांचे पालन न करणा-या लोकांवर कारवाई करताना जी तत्परता दाखविली जाते तिच तत्परता अशा ठेकेदारांच्या बाबतीत का दाखवत नाहीअसा प्रश्नही सातार्डेकर यांनी उपस्थित केला आहे. गणेश चतुर्थीपूर्वी शहरातील रस्ते केवळ दगड माती घालून नाही तर खडी व डांबराने ते बुझवावेत. तसेच खड्डयांसाठी जबाबदार असणा-या ठेकेदारावर व संबंधित अधिका-यांवर मुख्याधिका-यांनी त्वरित कारवाई करावी. असे न केल्यास या खड्डयांमुळे कोणाचा जीव गेल्यास याला जबाबदार सर्वस्वी नगरपरिषद व संबंधित अधिकारी हेच असतील असा इशारा अॅड.मनिष सातार्डेकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Close Menu