नौदलाकडून मच्छिमारांना मार्गदर्शन

भारतीय तटरक्षक दलभारतीय नौदलसिंधुदुर्ग पोलिस व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला पोलिस ठाणे हद्दीत सातेरी मंगल कार्यालय येथे सामुदायिक संफ कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित मच्छिमारांना नौदलाकडून सागरी सुरक्षिततेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.

      यावेळी भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय कुमारतटरक्षक दलाचे राजेंद्र बनकरएमएमबी अधिकारी संदिप भुजबळवेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधवमत्स्यविभाग वेंगुर्ला परवाना अधिकारी चिन्मय जोशीसंजय गावडेपोलिस स्टाफवेंगुर्लशिरोडा व मूठ मच्छिमार सोसायटीचे प्रतिनिधीस्थानिक मच्छीमार तसेच सागरी सुरक्षा रक्षकवार्डनस्थानिक ग्रामस्थ आदी उपस्थित होते. उपस्थितांना नौदलाकडून सुरक्षिततेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले व समस्या जाणून घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी मच्छिमारांना सागरी सुरक्षेबाबत घ्यावयाची दक्षतानौकांवर वापरण्यात येणारी यंत्रणाखराब हवामान असल्यास घ्यावयाची काळजीनौकांवर आवश्यक असणारी कागदपत्रेसमुद्रात संशयास्पद आढळल्यास घ्यावयाची खबरदारी आदी विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu