आवड व कल पाहून ध्येय निश्चित करा-मधुकर कुबल

१०० टक्के यशाची परंपरा कायम राखून पुढील शिक्षण घेत असताना आवड व कल पाहून पुढील ध्येय निश्चित करा असा बहुमोल संदेश मधुकर कुबल यांनी विद्यार्थीशिक्षक गुणगौरव व संस्थापक दिनावेळी दिला.

      उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्थापक दिन व विद्यार्थी-शिक्षक गुणगौरव कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी संस्था चेअरमन विरेंद्र कामत-आडारकरउपाध्यक्ष रमेश पिगुळकरसचिव रमेश नरसुलेसदस्य राधाकृष्ण मांजरेकरसुनिल परबसुजित चमणकरपालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मेस्त्रीश्रीधर शेवडेतांडेलवीणा नार्वेकरनार्वेकरगंगाराम गिरपश्रावणी शेवडे यांच्यासह अन्य पालक व संस्था हितचितक उपस्थित होते.

      मुख्याध्यापक उमेश वाळवेकर यांनी संस्थेचे संस्थापक कै. अण्णासाहेब सातार्डेकर यांच्या २०व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक ठेव निधीतून शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तर विरेंद्र कामत-आडारकर यांनी विद्यालयातून तालुक्यात प्रथम दहापैकी सहा विद्यार्थ्यांनी स्थान मिळविल्याबद्दल त्यांना प्रत्येकी १ हजार आणि ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांस रमेश पिगुळकर यांनी रोख पारितोषिके दिली. स्कूलमधील दहावीची विद्यार्थीनी प्रतिक्षा प्रदिप नाईक हिने एनएमएमएस परीक्षेत जिल्ह्यात प्रथम तसेच हिदी राष्ट्रभाषा परीक्षेत कोल्हापूर विभागातून प्रथम आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध रांगोळीकार रमेश नरसुले यांनी ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिरात सप्ताहानिमित्त गेली ५० वर्षे आपली कला उत्तमप्रकारे जोपासल्याबद्दल त्यांना सन्मानीत करण्यात आले.

      रमेश नरसुलेप्रतिक्षा नाईकममता नार्वेकरमनाली पवारपार्थ कोळंबकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्त अध्यापिका व कै.अण्णांच्या कन्या उल्का वाळवेकर यांनी अण्णासाहेबांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.  

      वर्षा मोहिते यांनी अहवाल वाचनकुबल यनी पारितोषिकांचे वाचनबोडेकर यांनी सूत्रसंचालन तर गोवेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu