पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी लेखी चाचणी परीक्षा

 माजी विद्यार्थी संघ – न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा, अभिनव फाउंडेशन, सावंतवाडी आणि किरात ट्रस्ट, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येत आहेत. या प्रशिक्षण वर्गासाठी 30 मुला मुलींची निवड करून त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

      या प्रशिक्षण वर्गात निवड होण्यासाठी लेखी चाचणी परीक्षा दिनांक 8 नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला येथे आणि मैदानी निवड चाचणी दिनांक 9 नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला कॅम्प मैदान येथे होणार आहे. सदरच्या निवड चाचणी करिता दिनांक 5 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीकरिता आणि अधिक माहिती करिता श्री. समीर घोंगे यांना 9960036174 या क्रमांकावर संपर्क करावा.

Leave a Reply

Close Menu