सुरपस्टार अभिनेते अमिताब बच्चन यांनी चाखला कोकणचा मेवा

वेंगुर्ल्यातील नर्मदा कॅश्‍यूच्या काजू लाडवांची भेट

      सुरपस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोकणचा मेवा म्हणून वेंगुर्ला येथील प्रसिद्ध नर्मदा कॅश्‍यू इंडस्ट्रीजचे स्वादिष्ट काजू लाडू भेट देण्यात आले. सौ.सुचित्रा मंदार तोरणे हिने दिलेल्या काजू लाडवांचा आस्वाद घेत अमिताभ बच्चन यांनी या उत्कृष्ट उत्पादनाबद्दल गौरवोद्गार काढले.

      टेलिव्हीजनवरील सोनी या वाहिनीवर सुरु असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या व्यासपिठावर दीपावली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमा वेळी वेंगुर्ल्याची सुकन्या सौ.सुचित्रा मंदार तोरणे हिने सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांना नर्मदा कॅश्‍यू इंडस्ट्रीजमध्ये उत्पादीत केलेले स्वादिष्ट काजू लाडू भेट स्वरुपात दिले. श्री. बच्चन यांनी या कोकणच्या मेव्याचा स्वाद त्वरित चाखलाही आणि या उत्कृष्ट उत्पादनाबद्दल गौरवोद्गारही काढले.

      सौ. सुचित्रा तोरणे या वेंगुर्ला-भटवाडी येथील उद्योजक प्रकाश सामंत यांच्या कन्या तर नर्मदा कॅश्‍यू इंडस्ट्रीजच्या संचालिका सौ.मंदाकिनी दिलीप सामंत यांच्या पुतणी होय.

Leave a Reply

Close Menu