भंडारीच्या क्रिकेट स्पर्धेत उभादांडा विजेता

  भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला आयोजित क्रिकेट स्पर्धा वेंगुर्ला भंडारी चषक २०२३चे उद्घाटन ८ फेब्रुवारी रोजी भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ल्याचे अध्यक्ष अॅड.श्याम गोडकर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत १८ संघांनी सहभाग घेतला आहे. यात दक्ष उभादांडा संघ विजेता ठरला. या संघास मंडळाकडून वेंगुर्ला भंडारी चषकतर रमेश नार्वेकर व बाबली वायंगणकर यांच्याकडून रोख ११ हजारांचे बक्षिस देण्यात आले. तसेच स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या रेडी येथील माऊली गणेश संघास मंडळाकडून वेंगुर्ला भंडारी चषकतर अॅड.अरविद कुंडेकर यांच्याकडून रोख ७ हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले.

      स्पर्धेतील मालिकावीर जितेंद्र नागोजी (रेडी) व सामनावीर प्रतिक गवंडे (परबवाडा) यांना चंद्रकांत आजगांवकर यांच्याकडून रोख ५००, उत्कृष्ट फलंदाज तेजस जुवलेकर (उभादांडा) याला अमेय नवार यांच्याकडून रोख ५००, उत्कृष्ट गोलंदाज सुरेश मांजरेकर (उभादांडा) याला बाळू धुरी (वेंगुर्ला) यांच्याकडून रोख ५०० व वरील सर्वांना भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाकडून वेंगुर्ला भंडारी चषक २०२३‘, उत्कृष्ट यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकर (उभादांडा) व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण भूषण गडेकर (रेडी) याला भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाकडून वेंगुर्ला भंडारी चषक २०२३देण्यात आले.

      स्पर्धेला समालोचक म्हणून सागर कदम, संतोष मोर्ये, राजा परब, गुणलेखक ओंकार मोर्ये, विशाल मोर्ये, तन्मय जोशी, पंच सुधीर सारंग, यशवंत किनळेकर, राजू गवंडे, नाना राऊळ, बबी कानडे यांनी काम पाहिले. बक्षिस वितरण प्रसंगी भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष अॅड.श्याम गोडकर, महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकर, सचिव विकास वैद्य, तालुका सरचिटणीस डॉ.आनंद बांदेकर, रमेश नार्वेकर, जयराम वायंगणकर, बाबली वायंगणकर, गजानन गोलतकर, आनंद केरकर, बबन नार्वेकर, श्रेया मांजरेकर, भरत आळवे, सत्यवान साटेलकर, यशवंत किनळेकर, सुरेश धुरी, कमलाकार नवार, जया चुडनाईक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu