न्यू इंग्लिश स्कूलचे पारितोषिक वितरण संपन्न

उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम साई मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन विरेंद्र कामत-आडारकर, सरपंच निलेश चमणकर, उपसरपंच कालेस्तिन आल्मेडासामाजिक कार्यकर्ते कार्मिस आल्मेडा, संस्था पदाधिकारी रमेश नरसुले, रमेश पिगुळकर, गोविद मांजरेकर, सुजित चमणकर, राधाकृष्ण मांजरेकर, मुख्याध्यापक उमेश वाळवेकर यांच्यासह पालक-शिक्षक संघ सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रा.पं.सदस्य, पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

      सामर्थ्य हे जिकण्यातून मिळत नसते ते अपार परिश्रमातून सिद्ध होत असते. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही असे प्रतिपादन विरेंद्र कामत-आडारकर यांनी केले. तर सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही. ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका, मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात असे विचार सरपंच चमणकर यांनी मांडले. यावेळी ग्रा.पं.निवडणूकीत निवडून आलेले निलेश चमणकर, कालेस्तिन आल्मेडा, माजी विद्यार्थी कार्मिस आल्मेडा, माध्यमिक गणित अध्यापक मंडळाचा आदर्श पुरस्कार प्राप्त उमेश वाळवेकर, शैक्षणिक वर्षात उत्तम मार्गदर्शन व अध्यापन कार्य केल्याबद्दल मनाली कुबल यांचा सन्मान करण्यात आला. तर शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धापरिक्षांमध्ये यश मिळविणा­या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. अश्वमी भिसे व मनाली कुबल यांनी पारितोषिकांचे वाचन, वर्षा मोहिते यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. मधुकर कुबल यांनी ईशस्तवन व स्वागतगीताचे आयोजन केले. दिपक बोडेकर यांनी सूत्रसंचालन तर वैभव खानोलकर यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Close Menu