कच­-यातून साकारल्या नाविन्यपूर्ण कलाकृती

 ‘स्वच्छता ही सेवा‘  हे स्वच्छतेचे महत्त्व आणि तत्त्व नवीन पिढीत रुजवताना या नव्या पिढीच्या नव्या संकल्पना आजमाविण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे कच­यातून प्रतिकृती स्पर्धा१३ फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण कलाकृती बनवून वेंगुर्ला शहरातील सर्व शाळांमधून एकूण १४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ह्या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला. वेंगुर्ला शहर शून्य कचरा व्यवस्थापन मॉडेल म्हणून ओळखले जाते. नको दंड नको शिक्षा, स्वच्छ वेंगुर्ला हीच इच्छाहे ब्रीद अंगिकारून आतापर्यंत वेंगुर्लावासीयांनी उत्स्फूर्त अशी साथ कायमच नगरपरिषदेला दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले होते. नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात इयत्ता पहिली ते चौथी, इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. मुलांनी आपल्या कल्पकतेने विविध कच­-यातल्या गोष्टींपासून उत्कृष्ठ प्रतिकृती तयार करून आणल्या आहेत. ह्या प्रतिकृतींचे प्रदर्शन पुढील चार दिवस स्वामी विवेकानंद सभागृह नगरपरिषद कार्यालय या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. मुलांचा चांगला प्रतिसाद पाहून मुख्याधिकारी परितोषक कंकाळ यांनी हे प्रदर्शन यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात भरविण्याचा मानस उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. यावेळी परीक्षक सुनील नांदोस्कर व संजय पुनाळेकर यांच्यासह कार्यालयीन अधिकारी संगीता कुबल तसेच नगरपरिषद अधिकारी सर्व शाळांचे शिक्षक, पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Close Menu