प्रा. डॉ. अभिजीत महाले

वेंगुर्ले येथील प्रा. डॉ. अभिजीत महाले यांना अलिकडेच मुंबई विद्यापीठाने अकैौंटन्सी विषयांतील संशोधन कार्यासाठी पीएचडी गाईड म्हणून मान्यता दिली आहे. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाचे मान्यताप्राप्त पीएचडी संशोधन केंद्र आहे. या केंद्रांतर्गत प्रा. महाले मार्गदर्शक म्हणून काम पाहतील. या केंद्राचा लाभ इच्छुक स्थानिक संशोधक अकौटन्सी व वाणिज्य  आनुषंगिक क्षेत्रात डॉ. महाले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करू शकतील. प्रा. महाले हे बांदा पानवळ येथील गोगटे वाळके वरीष्ठ महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर विभागात अध्यापन करतात. वेंगुर्ले येथील जुने व्यापारी व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ महाले यांचे ते पुत्र आहेत.

 

Leave a Reply

Close Menu