वेंगुर्ल्यात उत्साहात होळीचे पूजन

वेंगुर्ला तालुक्यात सोमवारपासून होळी उत्सवाला प्रारंभ झाला असून सोमवार व मंगळवारी प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार आंब्याची व सुपारीच्या झाडाची म्हणजेच पोफळीची होळी घालण्यात आली. तर मंगळवारी विविध रंगांची उधळण करीत रंगपंचमीही साजरी करण्यात आली.

      कोकणात इतर सणांबरोबरच होळी सणाला फार महत्त्व आहे. सोमवारी सायंकाळी ७ नंतर होळी उत्सवाला प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात आंब्याच्यापोफळीच्या होळी नाचवत नाचवत ज्या ठिकाणी घातली जाते त्याठिकाणी आणण्यात आली. तेथे पूजन करुन गा-हाणे करण्यात आले. वेंगुर्ला शहरात सोमवारी रात्री दाभोसवाडा, विठ्ठलवाडी, गिरपवाडा, भुजनाकवाडी, पूर्वस मंदिरहोळकर मंदिरदत्तमंदिरसुंदर भाटले याठिकाणी होळी घालण्यात आली. तर मंगळवारी सकाळी कुबलवाडा तसेच सायंकाळी देऊळवाडापरबवाडा याठिकाणी होळी घालण्यात आली. या उत्सवात अबालवृद्धांनी सहभाग घेऊन होळी उत्सवाचा आनंद लुटला.

Leave a Reply

Close Menu