वेंगुर्ल्यासाठी 44 कोटी 35 लाख रुपये  मंजूर

      शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मार्च 2023 या अर्थसंकल्पीय बजेटमधून वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण मार्ग, राज्य महामार्ग, प्रादेशिक पर्यटन योजनांसाठी 27 कोटी 35 लाख तर संरक्षक भिंत, धूपप्रतिबंधक बंधारे यासाठी 17 कोटी असा एकूण 44 कोटी 35 लाख रुपये निधी मंजूर करुन आणला असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वेंगुर्ला तालुका प्रमुख नितिन मांजरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

      बाळासाहेबांची शिवसेनेच्या वेंगुर्ला येथील संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी शहरप्रमुख उमेश येरम उपस्थित होते. केसरकर यांनी मार्च 2023 या अर्थसंकल्पीय बजेटमधून वेंगुर्ला-शिरोडा-सातार्डा रस्ता राज्य मार्ग सुधारणा व डांबरीकरण करणे, सातार्डा पुलाची दुरुस्ती करणे, वेतोबा मंदीर जवळ पूलाचे बांधकाम करणे, म्हापण-कोचरे-श्रीरामवाडी-कोचरे बंदर रस्ता राज्यमार्ग, भावई मंदीर शेजारी संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, वेंगुर्ला-मठ-बेळगाव रस्ता राज्य मार्ग सुधारणा व डांबरीकरण करणे, वेंगुर्ला-तुळस-सावंतवाडी रस्ता राज्यमार्ग शहरी भागामध्ये काँक्रीटीकरण व रस्त्यांची सुधारणा करणे, परुळे-शेळपी-निवती रस्ता ग्रामीण मार्ग सुधारणा व डांबरीकरण करणे, वेंगुर्ला-अणसुर-न्हैचिआड रस्त्यावर संरक्षक भिंत बांधणे, कोरजाई-आनंदवाडी-कर्ली रस्ता सुधारणा व डांबरीकरण, होडावडा शाळा नं. 1 ते राऊतवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण, केळुस-कालवी बंदर रस्ता सुधारणा व डांबरीकरण, कोचरा-चव्हाटा ते राऊळवाडी-आगारवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण, दाभोली होळीचा खुंट ते दाभोली-मठ रस्ता सुधारणा व डांबरीकरण, मठ स्वयंभू सातेरी देऊळवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण, उभादांडा-नमसवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण, कोचरा चव्हाटा ते उंबराचेपाणी रस्ता सुधारणा डांबरीकरण करणे, भेंडमळा-रामघाट रस्ता सुधारणा व डांबरीकरण, म्हापण निवती रस्त्यावर संरक्षक भिंत बांधणे, आडेली दाभाडेवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण, आडेली वजराट पिंपळाचे भरड ते वजराट देऊळवाडी रस्त्यावर संरक्षक भिंत बांधणे, वजराट चव्हाटा ते देवसू कांबळेवीर रस्त्यावर लहान पूलाचे बांधकाम करणे, मठ कणकेवाडी येथील कणकेश्वर मंदिर येथे संरक्षक भिंत बांधणे, वेतोरे झाराप रस्ता सुधारणा व डांबरीकरण, पाल वादळवाडी खाजणादेवी शाळा रस्त्यावर संरक्षक भिंत बांधणे अशी ग्रामीण मार्गसाठी 5 कोटी 15 लाख, राज्य महामार्ग, इजिमा प्रजिमासाठी 19 कोटी 20 लाख व प्रादेशिक पर्यटन योजनासाठी 3 कोटी मिळून एकुण 27 कोटी 35 लाख रुपये अंदाजित कामे मंजूर करुन आणली आहेत.

      याशिवाय वेंगुर्ला-सागरतीर्थ येथे संरक्षक भिंत बांधणे, रेडी यशवंतगड ते सिद्धेश्वर मंदिर येथील समुद्र किनाऱ्यालगत, शिरोडा वेळागर येथे समुद्रकिनारी, भोगवे किल्लेनिवती तसेच केळुस येथे धूपप्रतिबंधक बंधारा बांधणेसाठी असे एकूण 17 कोटी मंजूर करुन आणले असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वेंगुर्ला तालुका प्रमुख नितिन मांजरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply

Close Menu