सागर रक्षकांना टी शर्टचे वाटप

वेंगुर्ला तालुक्याला समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. अनेक देश विदेशातील पर्यटक याठिकाणी भेटी देतात. यामुळे समुद्र किनारे सक्षम होण्यासाठी सागर रक्षक सक्षम होणे गरजेचे आहे. पूर्वी सागरी मार्गाने बरेच आतंकवादी हल्ले झाले आहेत आणि यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. या सागर रक्षकांना सक्षम करण्यासाठी वेंगुर्ल पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी उचललेली पाऊले कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार कोकण परिक्षेत्राचे महासंचालक प्रविण पवार यांनी काढले.

      कोकण परीक्षेत्राचे पोलीस महासंचालक प्रविण पवार यांनी २८ मार्च रोजी वेंगुर्ला पोलीस स्टेशनला भेट देऊन पाहणी केली. यानंतर समुद्र किनारा सक्षम होण्याच्या दृष्टीने येथील सागर रक्षकांना पोलिसांचे चिन्ह असलेले टीशर्ट याचे वाटप वेंगुर्ला पोलीस ठाण्यामार्फत पोलीस महासंचालक प्रविण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सागर रक्षक हे पोलिसांचे सहकारी आहेत हे नागरिकांना लक्षात यावे व सागर रक्षकांना नागरिकांना विविध सूचना देताना सोपे जावे या उद्देशाने ७० सागर रक्षकांना हे टीशर्ट वाटप करण्यात आले. दरम्यान जी गावे समुद्र किना-याला आहेत त्या गावांना भेटी देऊन जास्तीत जास्त सागर रक्षक नेमण्याचा दृष्टीने प्रयत्न केले जातील असे यावेळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Close Menu