वेंगुर्ला पोलीस स्टेशनचे काम उत्कृष्ठ

वेंगुर्ला पोलीस स्टेशनची स्वच्छतानिगाप्रत्येक विभागाचे कक्ष चोख ठेवण्यासाठी येथील पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी उत्कृष्टकाम केलेले आहे. पोलीस स्थानकांत येणा-या नागरीकांना महत्त्वाच्या गुन्ह्याबाबत कोणती खबरदारी घ्यावी याचे भित्तीचित्राच्या माध्यमातून केलेले प्रबोधनाचे काम हे आदर्शवत आहे. अशी रचना जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्थानिकांत झाल्यास नागरीकांत ख-या अर्थाने जनजागृती होईल. अशाच अधिका-यांची खरी गरज आहे असे प्रतिपादन कोकण परीक्षेत्राचे पोलीस महासंचालक प्रविण पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

      वेंगुर्ला पोलीस स्टेशन तपासणीस मंगळवारी आलेल्या कोकण परीक्षेत्राचे पोलीस महासंचालक प्रविण पवार यांचे वेंगुर्ला पोलीस स्टेशनच्या पोलिसांतर्फे पोलीस निरीक्षक अतुल जाधव व पोलीस टीमने सलामी देऊन स्वागत केले. तदनंतर कोकण परीक्षेत्राचे पोलीस महासंचालक प्रविण पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवालवेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचेसमवेत वेंगुर्ले पोलीस स्टेशन मधील सर्व विभागांची बीट अंमलदार कक्षसी.सी.टी.व्ही. लावण्यात आलेली स्क्रीननागरिकांना मार्गदर्शन व माहिती अंतर्गत लावण्यात आलेली भित्तीचित्रे तसेच फलक आणि पोलीस स्टेशनच्या बाहेरील परीसर व भित्तिचित्रे आदींची पाहणी केली..

       त्यानंतर वेंगुर्ले पोलीस स्टेशन मधील सर्व अंमलदार दर्जाच्या पोलिसांना मार्गदर्शन केले. कोकण परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक पवीण पवार यांचे वेंगुर्ले पोलीस स्टेशन मध्ये आगमन होताच त्यांचे वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सर्वपथम पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच त्यांचे सोबत वेंगुर्ले पोलीस स्टेशन येथे आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पदीप सावंतसदस्य भरत सातोस्करयोगेश तांडेलमॅक्सी कार्डोज यांनीवेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समितीच्या सदस्या तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदेश सचिव व वेंगुर्ले नगरपरिषरीषदेच्या माजी नगराध्यक्ष नम्रता कुबलसिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौ. सुकन्या नरसुलेशिवसेनेच्या माजी पदाधिकारी सौ. मंजुषा आरोलकरशितल साळगांवकरशबाना शेख यांनीतसेच सिंधुदुर्ग जिल्हा शांतता समितीचे सदस्य श्रीनिवास गावडेसामाजिक कार्यकर्ते राजेश परबजयराम वायंगणकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Leave a Reply

Close Menu