गणपत मसगे यांना आदिवासी गिरीजन कलाकार पुरस्कार

  महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून दिला जाणारा आदिवासी गिरीजन कलाकार पुरस्कार सिंधुदुर्गचे सुपुत्र व राष्ट्रपती पुरस्कार विजेते पिंगुळी-गुढीपूर येथील लोककलाकार गणपत सखाराम मसगे यांना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ठाकर आदिवासी समाजाची चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या, चामड्याच्या बाहुल्या या कलांचे जतन- संवर्धन करून संपूर्ण देशात त्यांचा प्रसार मसगे यांनी केला. २००८ साली स्वतःच्याच घरात या कलांचे पुरातन वस्तुसंग्रहालय सुरू करून कला अभ्यासकांना मदत केली. या त्यांच्या कार्यात मसगे यांचे सुपुत्र श्री.बाळकृष्ण व श्री. शिवदास हे सहकार्य करीत आहेत. कलांच्या माध्यमातून कलाकारांना नवीन रोजगार उपलब्ध करून देणे जेणेकरून कला जीवंत राहील, यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.

           

 

Leave a Reply

Close Menu