केरवाडी चौगुलेश्वर गाबीत चषकाचा मानकरी

गाबीत समाज वेंगुर्लातर्फे गाबीत समाज मर्यादीत, वेंगुर्ला-कॅम्प सुनिल गावस्कर स्टेडीयम येथे आयोजित केलेल्या दोन दिवशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शिरोडा-केरवाडीच्या चौगुलेश्वर क्रिकेट संघाने प्रतिस्पर्धी सन्मुख उभादांडा-मुठ संघास ३१ धावांत रोखून धरत १५ धावांनी विजेता ठरला आणि प्रथम क्रमांकाचा तालुकास्तरीय गाबीत चषक व रोख रू ११,१११ चे पारितोषिक पटकाविले. तर उपविजेता सन्मुख उभादांडा-मूठ संघाला  चषक व रोख रु. ७७७७ चे बक्षिस देण्यात आले. या दोन्ही क्रिकेट संघांची मालवण-दांडी येथे दि २७ ते ३० एप्रिल होणा­या गाबीत समाजाच्या महोत्सवात दि २४ एप्रिल रोजी होणा­या मर्यादीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

        स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक श्याम सारंग यांच्या हस्ते झाले. तर पहिल्या क्रिकेट सामन्यासाठी नाणेफेकचा शुभारंभ बोट चालक-मालक संघाचे पदाधिकारी बाबी रेडकर यांच्या हस्ते झाले. गाबीत समाजाचे तालुक्यातील १४ संघ सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी गाबीत समाज वेंगुर्ल्याचे बाबुराव खडपकर, सुधीर सारंग, आनंद बटा, श्वेता हुले, सगुण सातोस्कर, पिंटू धावडे, श्रीराम कांदळगांवकर, पिंटु कुबल, चंद्रकांत चोडणकर, अमित कुबल सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. बक्षिस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभाराचे काम मच्छिमार नेते वसंत तांडेल यांनी केले. स्पर्धेत मालिकावरी राकेश सारंग (सन्मुख उमादांडा-मुठ), उत्कृष्ठ फलंदाज दिपू गिरप (सन्मुख उभादांडा-मुठ), उत्कृष्ठ गोलदांज चैतन्य परब (चौगुलेश्वर केरवाडा-शिरोडा) आदींनी बक्षिसे पटकाविली. बक्षिस वितरण गाबीत समाज वेंगुर्ला अध्यक्ष दिलीप गिरप, सचिव किरण कुबल व मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सरपंच मनोज उगवेकर, ट्राॅलर्स व्यावसायिक भाई मालवणकर, ज्येष्ठ मच्छिमार संभाजी येरागी, बाळू वस्त, जयंत मोंडकर, दादा केळुसकर, सदानंद गिरप, किरण तोरस्कर, सूर्यकांत सागवेकर, नागेश गांवकर, सतिश हुले, विजय तांडेल, अर्जुन गिरप, सुधीर नार्वेकर, उद्धव उगवेकर अदी उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन राजा परब, वेदांत परब, गुणलेखनाचे काम निलेश परब, स्वच्छता दूत संजय टेमकर यांनी तर पंच म्हणून सुनिल नाईक, अजित कानडे, बाबू टेमकर यांनी काम पाहिले.

 

Leave a Reply

Close Menu