विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

वेंगुर्ला वेशी भटवाडी येथील चंद्रभागाया  नविन विहिरीचे व तेथेच बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे, वेंगुर्ला न.प.ला देण्यात आलेल्या ४ चाकी, ३ चाकी ऑटो टिपर, स्टेनलेस स्टील टॉयलेट, वेलिग मशिनचे लोकार्पण सोहळा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी झाले. शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे केसरकर यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहरप्रमुख उमेश येरम, प्रवक्ते सुशिल चमणकर, श्रद्धा बाविस्कर, सुनिल डुबळे, बाळा दळवी, गणपत केळुसकर, मठ सरपंच रुपाली नाईक, अजित नाईक, योगेश तेली, संतोष परब, प्रकाश मोठे, एकनाथ राऊळ, नरेंद्र बोवलेकर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, नायब तहसिलदार संदीप पानमंद, पोलिस निरीक्षक अतुल जाधव उपस्थित होते. दरम्यान, सागर गावडे (वडखोल) यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे व संरक्षक कठड्याचे बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन केले.

Leave a Reply

Close Menu