सायबर क्राईमपासून सुरक्षित रहा-पो. अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल

पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक वेंगुर्ला यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ला पोलीस ठाण्याकडून शिरोडा वेळागर समुद्र किनारी सायबर क्राईम जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सायबर क्राईम पासून सुरक्षित रहाण्याबाबत नागरिकांना आवाहन केले. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, कोणताही अननोन नंबर हा फ्रॉड असू शकतो, त्यापासून सावध रहा अशा सूचनाही केल्या. सायबर क्राईम विषयी घडणा­या गुन्ह्यांबाबत पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याची कथा, लेखन आणि दिग्दर्शन चौहान यांनी केले. तर वेंगुर्ला होमिओपॅथीक मेडीकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी त्यांचे उत्कृष्टसादरीकरण केले. त्यांचे पोलीस अधीक्षकांनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केले. तसेच शिरोडा अ.वि.बावडेकर विद्यालय व गोगटे कॉलेज येथील विद्यार्थ्यांच्या चित्रकला, निबंध स्पर्धा घेवून त्याचे प्रदर्शन ठेवून सहभागी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

       यावेळी सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंखे, कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळी, सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक संदीप भोसले, वेंगुर्ल्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, मोचेमाड सरपंच स्वप्नेशा पालव, शिरोडा ग्रा.प.सदस्य हेतल गावडे, रश्मी डिचोलकर, माजी सदस्य आजू अमरे, माजी सभापती जगन्नाथ डगरे, आरवली देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय, आरवली पोलीस पाटील मधुसूदन मेस्त्री यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पर्यटक उपस्थित होते. पोलीस बँड पथकाने चलते चलते मेरे ये गीत‘, ‘याद रखनाया संगीताने कार्यक्रमाची सांगता केली. सूत्रसंचालन काका सावंत तर आभार पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu