महिलांनी काथ्या उद्योगाचा फायदा घ्या-दामले

महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र व महिला काथ्या औद्योगिक सहकारी संस्था वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने महिला काथ्या सहकारी संस्थेमध्ये एक महिना कालावधीचा तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. सीएमईजीपी योजनेतून ५० लाख रुपयांपर्यंत स्वयंरोजगार करू इच्छिणा-­या महिलांना या प्रशिक्षणाचा निश्चित फायदा होईल. राज्य शासनाच्या काथ्या उद्योग धोरणानुसार उद्योग करून महिलांनी याचा फायदा घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर श्रीपाद दामले यांनी केले.यावेळी क्वॉयर फाऊंडेशनचे चेअरमन एम.के.गावडे, एमसीईडीचे शंकर सावंत, एमसीईडीचे रामचंद्र गावडे, काथ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, डीआयसीचे मॅनेजर प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. काथ्या उद्योगाचे आजपर्यंत ३ हजार पेक्षा जास्त महिलांना तर गुहागर तालुक्यातील ६० अपंगांना काथ्या प्रशिक्षण दिले आहे. वेंगुर्ला येथे सुरू होणा­या क्वॉयर क्लस्टर उद्योगामधून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने तयार झालेल्या क्वॉयर क्लस्टरचे उद्घाटनही लवकरच करण्यात येणार आहे, असे यावेळी एम.के.गावडे यांनी सांगितले. या प्रशिक्षणात उद्योगाबाबत माहिती, उद्योग उभारण्यासाठी बँक कर्ज, मार्केटिंग, वैयक्तिक वेळ व्यवस्थापन, नेतृत्व विकास, काथ्या प्रॉडक्ट प्रात्यक्षिक याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणाचा ७० महिलांनी लाभ घेतला.

Leave a Reply

Close Menu