शिंदे सरकार स्थिर! मिठाई वाटून केला शिवसैनिकांनी आनंदोत्सव

       न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थिर असल्याचे समजताच वेंगुर्ला शिवसेनेच्यावतीने कार्यालयासमोर फटाक्याची आतषबाजी करत व सर्वांना लाडू व पेढे भरवत जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला.
जनतेचे काम करणा¬या सर्वसामान्य शिवसैनिकांना न्यायालयाच्या निकालाने ख¬या अर्थाने न्याय मिळाला. त्यामुळे जनसामान्यांची करुणा असणारा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ही ओळख संपूर्ण महाराष्ट्राला या न्यायालयाच्या निकालातून पुन्हा एकदा मिळाली आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंद दिघे यांना हा न्यायालयाचा निकाल ख¬या अर्थाने समाधान देणारा ठरला आहे. या निकालामुळे सर्वसामान्य शिवसैनिकात पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विकास कामाची पोचपावती ठरणारा हा निकाल आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी व्यक्त केली.
यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या समवेत जिल्हा संघटक सुनिल डूबळे, शहर प्रमुख उमेश येरम, महिला शहर प्रमुख श्रद्धा बाविस्कर-परब, मच्छीमार सेल प्रमुख गणपत केळुसकर, अल्पसंख्यांक शहर प्रमुख शबाना शेख, प्रवक्ते सुशील चमणकर, श्यामसुंदर कोळंबकर, शिवाजी पडवळ, कृतिका कुर्ले, सावनी आडारकर, सुधीर धुरी, दयानंद सावंत, रमेश परब, रसिका राऊळ, सुरेंद्र वारंग, कृष्णा तुळसकर आदी शाखा प्रमुख, विभाग प्रमुख ग्रा.पं.सदस्य व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu