यशामध्ये सातत्य राखणे सर्वात मोठे आव्हान! -पालकमंत्री चव्हाण

  वेंगुर्ला नगरपरिषदेला मिळालेले यश म्हणजे टीमवर्क आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधी ही रथाची दोन चाके असतात. ही दोन्ही चाके जर एकत्र मिळून काम करायला लागली तर काय बदल होऊ शकतो हे खऱ्या अर्थाने वेंगुर्ला नगरपरिषदेने दाखवून दिले आहे. शहर सुंदर बनवायचे असेल तर शहरातील नागरिकांची मानसिकता असावी लागते. वेंगुर्ल्यातील नागरिकांनी हे करुन दाखविले आहे. सर्व मिळालेले पुरस्कार एक वेगळी जाणीव करुन देत असतात की आम्हाला यानंतरच्या काळात सुद्धा अव्वल राहिले पाहिजे. हे सर्व टिकवणे हे त्याहून मोठे आव्हान आहे. असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

      सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच त्यांनी वेंगुर्ला न.प.ला भेट दिली. रवींद्र चव्हाण यांचा नगरपरिषदेतर्फे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वेंगुर्ले नगरपरिषदेस सौंदर्यीकरणात राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल न.प.चा सत्कार तसेच स्वच्छतेसाठी प्रत्यक्ष राबणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा सत्कार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला. यावेळी तालुका भाजपातर्फे सुहास गवंडळकर व आंबा बागायतदार प्रीतम सावंत यांच्या हस्ते पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना हापूस आंब्यांचा हार घालून स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरीप, प्रसन्ना देसाई, शिवसेना जिल्हा संघटक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, माजी उपनगराध्यक्षा शीतल आंगचेकर, अभिषेक वेंगुर्लेकर, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, नागेश गावडे, धर्मराज कांबळी, साक्षी पेडणेकर, कृपा गिरप-मोंडकर, पूनम जाधव, सुषमा प्रभू-खानोलकर, लेखिका वृंदा कांबळी, भाजपा प्रदेश कार्यालय सदस्य शरद चव्हाण, संघाचे चेअरमन ज्ञानेश्‍वर केळजी, विजय रेडकर, बाबली वायंगणकर, साईप्रसाद नाईक, सोमनाथ टोमके, वसंत तांडेल, आनंद उर्फ बिटू गावडे, वृंदा गवंडळकर, प्रार्थना हळदणकर, वृंदा मोर्डेकर, सुजाता पडवळ, प्रकाश रेगे, कमलाकांत प्रभू, राजबा सावंत, रवींद्र शिरसाट, सूर्यकांत परब, ॲड. श्‍याम गोडकर, प्रा. सचिन परुळकर, कवयित्री प्रीतम ओगले, रसिका मठकर, तुषार साळगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप म्हणाले, कंकाळ यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक विकासकामे तसेच स्वच्छतेच्या कामांवर लक्ष घातले. कामे करताना माजी लोकप्रतिनीधी तसेच नागरिकांना विश्‍वासात घेत त्यांच्या सूचनांचा आदर करीत केलेल्या कामांमुळे शहर सौंदर्यीकरणाची कामे चांगल्या प्रकारे राबविली. त्यामुळे नगरपरिषदेला शहर सौंदर्यीकरणात राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. शहरातील विकासकामे व स्वच्छतेच्या कामांकडे मुख्याधिकाऱ्यांसह प्रशासनाने लक्ष द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्याधिकारी यांनी नगरपरिषद राबवित असलेल्या सौरउर्जा प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी केली. प्रास्ताविक मुख्याधिकारी कंकाळ यांनी तर सूत्रसंचालन माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.

 

Leave a Reply

Close Menu