वायंगणी येथे स्व.विजया नाईक स्मृती गोशाळेचे भूमिपूजन संपन्न

  हिंदू धर्मामध्ये गाईला देव मानले जाते. या गाईंचे पालन, पूजन आणि संगोपन करणे काळाची गरज आहे. याच उद्देशाने सुरू होत असलेली ही स्व. विजया नाईक स्मृती गोशाळा हा ट्रस्टचा उपक्रम समाजाला प्रेरणा देणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी वेंगुर्ले पाटील चेंबर्स येथील कार्यक्रमात बोलताना केले.

      वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथे होणाऱ्या स्व.विजया नाईक स्मृती गोशाळेचे भूमिपूजन 5 मे रोजी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंडित वसंतराव गाडगीळ, श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टचे डॉ. राजेंद्र खेडेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडकर, प्रसाद खंडागळे, सदानंद आगलावे, वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर केळजी, तसेच बाबली वायंगणकर, शरद चव्हाण, साईप्रसाद नाईक, जी.जी. साळगावकर, भगवान महाराज कोकरे, सौ मनीषा खेडेकर, सौ गौरी कामत कणसे, किरण राऊत यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

      वायंगणी येथे श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट तर्फे उभारण्यात येणाऱ्या या गो शाळेचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. भूमीचे पूजन करून या ठिकाणी असलेल्या गाईचे पूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी मानले.

      श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टचा 15 वा वर्धापन दिन वेंगुर्ले येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर, किर्तन, जल्लोष महिलांचा व म्युझिकल मेलडी, तसेच श्री सद्गुरु आरोग्य सेवा व निसर्गोपचार केंद्राचे लोकार्पण अशा विविध कार्यक्रमांनी दिवसभर साजरा झाला.

 

Leave a Reply

Close Menu