पासिग व्हॉलीबॉल स्पर्धेत बोथम वॉरियर्स विजेता

 

      जय मानसीश्वर स्पोर्ट ग्रुपतर्फे वेंगुर्ला येथे १३ व १४ मे रोजी घेण्यात आलेल्या पासिग व्हॉलिबॉल स्पर्धेत बोथम वॉरियर्स वेंगुर्ला या विजेता ठरला. या संघाला रोख १५ हजार व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आला. स्पर्धेचे उद्घाटन माजी पोलिस उपअधिक्षक दयानंद गवस, व्हॉलीबॉल कोल्हापूर विभागाचे सेक्रेटरी निलेश चमणकर, विनय पाटील, बाबली वायंगणकर, परशुराम वारंग, गंगाराम डोंगरे, ज्ञानेश्वर केळजी, जितेंद्र गायकवाड, रमाकांत परब, हेमंत गावडे, प्रणव वायंगणकर, राधाकृष्ण पेडणेकर, जया चुडनाईक, नामदेव सरमळकर, तुषार साळगांवकर आदी उपस्थित होते. खेळातून कसे करिअर घडवू शकतो याबाबत मार्गदर्शन करताना वेंगुर्ल्यात यापुढे चांगले खेळाडू घडावेत यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे श्री. गवस यांनी सांगितले. स्पर्धेत कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई, गोवा, सिधुदुर्ग येथील नामवंत १६ संघांनी सहभाग घेतला होता. गोवा येथील काळे परब हा संघ उपविजेता ठरला. त्याला रोख १० हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा माजी पोलिस उपअधिक्षक दयानंद गवस, विनय पाटील, बाबली वायंगणकर व परशुराम वारंग यांच्या सौजन्याने घेण्यात आली होती. बेस्टस्मॅशर प्रितेश परब, बेस्ट डिफेंडर नागेश नाईक (गोवा), बेस्ट टॉसर हृतिक कंधरी तर बेस्टखेळाडू म्हणून शोएब शेख (वेंगुर्ला) यांना गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जय मानसीश्वर वेंगुर्ला संघाने मेहनत घेतली.

 

Leave a Reply

Close Menu