राहूल आणि सान्वी आडारकर ठरली युनिक कपल २०२३

गौड सारस्वत समाज वेंगुर्ला उपसमितीने वेंगुर्ला येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात खास विवाहित जोडप्यांसाठी आयोजित केलेल्या युनिक कपल स्पर्धा २०२३या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उत्तरोत्तर रंगतदार ठरलेल्या या स्पर्धेत विविधांगी कला प्रकार सादर करीत राहूल व सान्वी आडारकर यांनी रोख रु.१५ हजार, ट्राॅफी व प्रशस्तीपत्रासह प्रथम पारितोषिक पटकाविले.  या स्पर्धेत नऊ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन गौड सारस्वत समाज सिधुदुर्गचे अध्यक्ष चंद्रकांत नाडकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी सारस्वत बँकेचे संचालक सुनिल सौदागर, अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, वेंगुर्ला अध्यक्ष सुजाता पडवळ, सचिव अमृता पाडगांवकर, खजिनदार सुधीर झांटये, परिक्षक केदार सामंत, अमित देसाई, नंदिनी देसाई, समितीचे पदाधिकारी दिगंबर नाईकअमोल आरोस्कर, तृप्ती आरोस्कर, राखी दाभोलकर, अमोल प्रभूझांट्ये, अमोल खानोलकर, अॅड. सुषमा खानोलकर, स्मिता नाबर, सिमा नाईक, स्वाती पोतनिस, संजय पूनाळेकर, डॉ. प्रसाद प्रभूसाळगांवकर उपस्थित होते.

     स्पर्धेत द्वितीय पारितोषिक रु. ११ हजार हे संजय व मानसी कांबळे यांनी जिकले. तर तृतीय पारितोषिक रु. ८ हजार अतुल व अस्मिता वाडोकर यांनी पटकाविले. तसेच बेस्ट कोऑर्डनिशनचे पारितोषिक हे राहूल व सान्वी आडारकर यांनी, बेस्ट कॅटवॉकचे पारितोषिक संजय व मानसी कांबळे यांनी तर बेस्ट आऊट फिटचे पारितोषिक विकेश व प्रिन्सी रायकर यांनी जिकले. मुख्य कार्यक्रमाचे निवेदन शुभम धुरी यांनी आपल्या बहारदार शैलित करुन सर्वांची वाहवा मिळविली. कु. शर्वरी नाबर यांनी कोरियोग्राफी केली. मध्यंतरामध्ये घेतलेल्या फनी गेम्सने मजा आणली. खास मालवणी स्टॉल वरील चमचमित मसालेदार पदार्थ आकर्षण ठरले. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास जनार्दन शेटये, सचिन वालावलकर यांची मोलाची मदत झाली.

 

Leave a Reply

Close Menu