प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणूकीत १५ पैकी १३ जागांवर निर्विवाद विजय मिळवत भाग्यलक्ष्मी पॅनेलने या पतसंस्थेवर सलग पाचव्यांदा एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे. जिल्हा मतदारसंघाच्या सातही जागा भाग्यलक्ष्मी पॅनेलने राखल्या असून सावंतवाडी आणि दोडामार्ग हे दोन तालुके वगळता अन्य सहा तालुका मतदारसंघातही झेंडा रोवला आहे.
जिल्हा मतदारसंघ सर्वसाधारण पुरुषमधून नारायण नाईक, संतोष राणे, सर्वसाधारण महिलांमधून ऋतुजा जंगले, समिक्षा परब, अनुसूचित जमाती प्रवर्गातून चंद्रसेन पाताडे, मनोजकुमार आटक, इतर मागास प्रवर्गातून महेंद्र पावसकर, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातून संजय पवार, तालुका मतदार संघातून मालवण – मंगेश कांबळी, वैभववाडी-संतोष मोरे, देवगड-सचिन बेर्डे, कुडाळ-विजय सावंत, कणकवली-श्रीकृष्ण कांबळी, वेंगुर्ला-सीताराम लांबर, सावंतवाडी-सुभाष सावंत, दोडामार्ग-दयानंद नाईक यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे.