काजू फळपीक विकास योजनेत सहभागी व्हा!

महाराष्ट्रातील काजूच्या सर्वंकष विकासासाठी काजू फळपीक विकास योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अनुदान देण्यात येत आहे. इच्छुक शेतक­यांनी या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड यांनी केले आहे.

खासगी क्षेत्रातील रोपवाटिका स्थापन व बळकटीकरणासाठी अनुदान किमान ५० गुंठे ते जास्तीत जास्त १ हेक्टर क्षेत्र असून अनुदान ७ लाख ५० हजार रुपये, प्लास्टिक आच्छादनासह शेततळे सुविधेसाठी अनुदान प्लास्टिक ७५ हजार रुपये देण्यात येते. कृषी विभाग जिल्हा परिषदमार्फत सिचनाकरिता प्रति विहिर २ लाख ५० हजार, कृषी यांत्रिकिकरण योजनेमार्फत फवारणी यंत्र, पॉवर विडर, ग्रासकटर १८ हजार रुपये प्रति युनिट, एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेमार्फत जुन्या बागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ५० टक्के व जास्तीत जास्त २० हजार रुपये, प्रति हेक्टरी ०.२० ते २ हेक्टरपर्यंत एकात्मिक विकास अभियान पीएमएफएमई मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेमार्फत काजू प्रक्रिया उद्योग आधुनिकरणासाठी सर्वसाधारण क्षेत्र ४० टक्के कमाल रुपये १० लाख व डोंगराळ अतिसुचित क्षेत्र ३५ टक्के कमाल रुपये १३ लाख ७५ हजार रुपये, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेमार्फत पॅक हाऊस व ड्राईंग यार्ड उभारणीसाठी अनुदान सर्वसाधारण क्षेत्र ३५ टक्के कमाल रुपये १० लाख व डोंगराळ अधिसुचित क्षेत्र ५० टक्के कमाल रुपये २५ लाख देण्यात येते.

      शेतकर्‍यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज हा महा ई सेवा केंद्र येथून करावा. त्यासाठी अर्जासोबत सातबारा, आठ अ, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, आधारकार्ड आदी कागदपत्रे जोडून अर्ज ऑनलाईन करावा. काजू उत्पादक शेतकर्‍यांनी व प्रक्रिया उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Leave a Reply

Close Menu