राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या वेंगुर्ला शाखेचे अध्यक्ष डॉ.संजिव लिगवत यांनी वेंगुर्ला आगारातील व्यवस्थापक, चालक, वाहक व कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र वेंगुर्ल्याचे सचिव संजय पाटील, सहसचिव सुजाता पडवळ, सदस्य विश्वास पवार, संजय वेंगुर्लेकर, रुपाली पाटील यांच्यासह आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, वाहतूक निरीक्षक विशाल शेवाळे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक लालसिंग पवार, वाहक-चालक साई दाभोलकर, चालक एस.एम.सावंत, आशिष खोबरेकर आदी उपस्थित होते. राज्य महामंडळ कर्मचारी यांनी वेळप्रसंगी राज्याच्या तळागाळापर्यंत दिलेली सेवा कौतुकास्पद असून आम्ही त्यांची कृतज्ञता व्यक्त करता असल्याचे डॉ.संजिव लिगवत यांनी सांगितले.