बॅ.खर्डेकर महाविद्यालयात सेवानिवृत्तांचा सत्कार

बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील व्होकेशनल विभागाकडील ज्येष्ठ प्राध्यापक बाबासाहेब जाधव, अशोक गडकरी व ग्रंथालय परिचर प्रदिप बोवलेकर हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० एप्रिल रोजी तर वाणिज्य विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक सदाशिव भेंडवडे हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने या सर्वांचा महाविद्यालयाच्यावतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

      सेवानिवृत्तांच्या प्रामाणिक सेवेबद्दल व प्रशासनाला दिलेल्या सहकार्याबद्दल प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांच्या प्रामाणिक सेवेबद्दल गौरवोद्गार काढले. शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर या संस्थेने आपल्याला सेवा करण्याची संधी दिली याबद्दल प्राचार्य डॉ.एम.आर.देसाई, माजी आमदार दिलीप देसाई, विद्यमान सचिव जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, संस्था चेअरमन मंजिरी मोरे-देसाई, संचालिका अंजली देसाई यांचे सर्व सेवानिवृत्तांनी ऋण व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ.वसंतराव पाटोळे यांनी, प्रा. संपदा दिक्षित यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रा.सीमा सावंत यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu