दाभोली ग्रामस्थांतर्फे वसंत दाभोलकर याचे जल्लोषी स्वागत

यु.पी.एस.सी.परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथम आपल्या दाभोली (वेंगुर्ला) या मूळ गावी आल्यानंतर संपूर्ण दाभोली गावातर्फे वसंत प्रसाद दाभोलकर याचे ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले.

      वसंत याच्या स्वागताला प्रसिद्ध चित्रकार अरुण दाभोलकर, सरपंच उदय गोवेकर, श्री. सावंत सर, दाभोली इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर, नरेश बोवलेकर, अशोक दाभोलकर-मेस्त्री, वसंतचे आईवडील, नातेवाईक, पोलिसपाटील जनार्दन पेडणेकर, केतन आप्पा खानोलकर मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते  यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. वसंत याचे महिलांनी औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर दाभोली गावाच्या प्रवेश द्वारावरुन ते वसंत याच्या घरापर्यंत त्याची उत्साही वातावरणात मिरवूणक काढण्यात आली. वसंत याने सर्वांचे आभार मानताना भविष्यात आयएएस होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

      दुसऱ्या दिवशी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण व संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी वसंत याच्या घरी जाऊन त्याचे अभिनंदन केले आणि शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्याचा सत्कारही केला. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, राजन गिरप, साईप्रसाद नाईक, बाळा सावंत, बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडीस, शैलेश जामदार, बाबा राऊत, संदिप पाटील, प्रणव वायंगणकर, कमलेश करंगुटकर, देवेंद्र राऊळ, रविंद्र शिरसाठ, ओंकार चव्हाण, हेमंत पेडणेकर, विष्णू दाभोलकर, आनंद नवार, सीताराम मिशाळे, संतोष साळगावकर, ग्रामपंचायत सदस्य अवधूत राऊत व शामल मिशाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu