अंमली पदार्थ विरोधी जनजागृती

अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल व अप्पर पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनानुसार वेंगुर्ला पोलीस स्टेशनतर्फे १९ ते २६ जून या कालावधीत राबविण्यात येणा­या अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ १९ जून रोजी वेंगुर्ला बसस्थानक येथे पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी पोलीस कर्मचारी सुरेश पाटील, रमेश तावडे, ट्रॅफिक पोलीस मनोज परूळेकर व गौरव परब, महिला होमगार्ड चैताली निवजेकर, वृणाली कृष्णाजी, सोबिना डिसोजा तसेच रिक्षा संघटनेचे तालुका अध्यक्ष एकनाथ राऊळ, रिक्षाचालक, एस.टी. प्रवासी व नागरिक उपस्थित होते. महिला हेड कॉन्स्टेबल रंजिता चौहान यांनी अंमली पदार्थ व त्याच्या सेवनामुळे होणा­या परिणामांची माहिती देत सर्व पुरूष व महिला नागरिकांनी तसेच युवापिढीने या व्यसनापासून दूर रहावे. बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ जर कोठे विकले जात असतील तर त्याची माहिती गोपनीयरित्या पोलीस निरीक्षकांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Close Menu