कोकणच्या आईनस्टाईनचा जादुई अविष्कार

   वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचा रहिवासी असलेला 5 वी इयत्तेतील विजय दिनेश तुळसकर आपल्या अचाट बुद्धीमत्तेने शालेय प्रवासासोबत गायन वादनातही अग्रेसर आहे. कोकणचा आईनस्टाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयने अलिकडे आपल्या नव्या डिजिटल पियानोवर एकाच वेळी भारत आणि अमेरिका या दोन देशांचे राष्ट्रगीत वाजवत आपले कौशल्य दाखवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भेटीनंतर इंडोअमेरिकन मैत्रीपर्वाचे निमित्त साधून त्याचे हे जादुई कौशल्य समाजमाध्यमावर आले आहे. मुंबईतील सावली ट्रस्ट मार्फत मिळालेल्या डिजिटल पियानोवर मार्गदर्शक अजित चव्हाण यांच्या सहकार्याने इंडियन क्लासिकल व वेस्टर्न म्युझिक शिकणाऱ्या विजयने अल्पावधीतच कमालीचे यश प्राप्त केले आहे.

Leave a Reply

Close Menu