दाभोली गावामध्ये कृषीदूतांचे आगमन

उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम 2023 अंतर्गत दाभोली गावामध्ये कृषीदुतांचे आगमन झाले आहे. हे विद्यार्थी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत गावामध्ये राहून शेतीविषयक माहिती घेणार आहेत. गावात राहून गावची शेतीविषयक कार्यपद्धती, विविध संस्था, शाळा, शेतीवर आधारित विविध उद्योग यांची सविस्तर माहिती घेणार आहेत. विविध शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतीविषयक ज्ञानाची देवाणघेवाण करणार आहेत. सदर गटामध्ये शुभम घवाळी, तेजस काणेरकर, सौरभ सैद, चैतन्य गायकवाड, साईनाथ शिंदे, जोबिन सलीन या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Close Menu