वेंगुर्ला शाळा नं.१ला पाण्याची टाकी प्रदान

वेंगुर्ला शहरातील प्राथमिक शाळा वेंगुर्ला नं.१ मधील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी व स्वच्छतागृहासाठी पाण्याच्या टाकीची अत्यंत आवश्यक होती. शिक्षक पालक संघाच्या माध्यमातून ही बाब लक्षात आल्यानंतर रोटरी वेंगुर्ला  मिडटाऊनचे सेक्रेटरी योगेश नाईक यांनी पुढाकार घेऊन रोटरीतर्फे रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे भावी प्रांतपाल शरद पै यांच्या हस्ते शाळेला पाण्याची टाकी प्रदान केली. यावेळी बेळगाव रोटरी क्लबचे जीवन खटाव, रोटरी वेंगुर्ला मिडटाऊनचे प्रेसिडेंट शंकर वजराटकर, सेक्रेटरी योगेश नाईक, अॅड. प्रथमेश नाईक, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, माजी अध्यक्ष सुनील रेडकर, सदाशिव भेंडवडे, आनंद बोवलेकर, मृणाल परब, प्रा.वसंतराव पाटोळे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरलमलकर यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच योगेश नाईक व प्रेसिडेंट शंकर वजराटकर यांनी वॉटर अॅण्ड सॅनिटेशन अंतर्गत या टाकीसाठी प्रयत्न केले.

Leave a Reply

Close Menu